खटाव तालुक्‍याचा दुष्काळ यादीत समावेश करा

वडूज : ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना तालुकाप्रमुख युवराज पाटील, सुशांत पार्लेकर, महेश गोडसे व इतर शिवसैनिक.

ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

वडूज, दि. 1 (प्रतिनिधी) – खटाव तालुका दुष्काळी यादीतून वगळला असून या तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी आलेल्या ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसनेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, तालुकाप्रमुख युवराज पाटील, उपतालुका प्रमुख महेश गोडसे, शहरप्रमुख सुशांत पार्लेकर उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनातील माहिती कायमस्वरूपी दुष्काळी समजला जाणारा खटाव तालुका शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीतून वगळला आहे. सध्या तालुक्‍यात बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती असून पावसाअभावी रब्बीची पिके ही धोक्‍यात आली आहेत.
पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती असून सध्या काही गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही गावांनी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. तालुक्‍यातील दुष्काळाची तीव्रता वाढली असून येथील शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी याबाबत आंदोलन ही केले आहे.
तरी आपल्या स्तरावर खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, तसेच तालुक्‍याच्या पूर्व भागातील येरळवाडी धरणात उरमोडीचे पाणी सोडून दुष्काळाची दाहकता कमी करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी उपतालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, संतोष दुबळे, सुधीर गोडसे, सुधीर माने, आकाश माने, आकाश फडतरे, प्रदीप गोडसे, संदीप गोडसे, चैतन्य गोडसे, समीर गोडसे, सोहेल मुल्ला, पप्पू पवार, बबन गोडसे, निलेश गोडसे, करण गोडसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)