खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा

मोळ ः दुष्काळी भागाची पाहणी करताना आयुक्त दिपक म्हैसेकर, कैलास शिंदे, दादासाहेब कांबळे व ग्रामस्थ. (छाया ः प्रकाश राजेघाटगे)

बुध, दि. 26 (प्रतिनिधी) – शासनाच्या दुष्काळी भागाच्या निकषामध्ये दुष्काळी तालुका यादीत खटाव तालुका समाविष्ट झाला नसल्याने व विशेषतः शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे. खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधीनी शासन दरबारी लावून धरल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी खटाव तालुक्‍यातील मोळ, मांजरवाडी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद करीत पिकांची पाहणी केली.
त्यांच्यासमवेत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी महेश शेंडे, तहसिलदार जयश्री आव्हाड, सहाय्यक गटविकास अधिकारी मेढेवार, तालुका कृषी अधिकारी शिवाजी चौगुले, महसुल, कृषी व ग्रामविकास लघु पाटबंधारे खात्याचे अधिकारी, उपसभापती संतोष साळुंखे, कैलास घाडगे, माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, सरपंच अभय सिंह राजेघाटगे, राजेंद्र कचरे उपस्थित होते.
आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी मोळ, मांजरवाडी या गावातील कांदा, रब्बी ज्वारी व विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी, शेतातील लघु पाटबंधारे खात्याचे तलाव तसेच विहिरींची पाहणी करून दुष्काळाची तीव्रता जाणून घेतली. मोळमधील अरुण वाघ, जगन्नाथ घाटगे, जालिंदर वाघ, कांळगे सर, भगवान गायकवाड, शशिकांत गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, सरपंच लता गायकवाड यांच्याशी संवाद साधून अडचणी समजवून घेतल्या. यावेळी आयुक्त यांनी पिण्याचे पाणी व चारा नियोजन करण्याबाबत उपाययोजना सुचविल्या. तसेच ललगुण येथील रमाई घरकुलची पाहणी केली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)