खटाव तहसील कार्यालयात संजय गांधी योजनेची 57 प्रकरणे मंजूर

तालुकाध्यक्ष विजय शिंदे यांची माहिती

वडूज – येथील तहसील कार्यालयात पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल 57 प्रकरणे मंजूर करण्यात आली; तर काही प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यावर निर्णय झाला नाही. तसेच 9 दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ झाली असल्याची माहिती समितीचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे यांनी तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत दिली.

या बैठकीत तहसीलदार जयश्री आव्हाड, नायब तहसीलदार भादुले, सदस्य मंदार जोशी, चंद्रकांत शिंदे, डॉ. मीना इंजे, अर्जुन पाटील, महिपती दंगारे, अमीन आगा, तानाजी जाधव, उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग आणि वृद्धापकाळ योजनेची 26 प्रकरणे मंजूर झाली तर विधवा 16, श्रावणबाळ 15 प्रकरणे मंजूर झाली आहेत.
तर उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने सदर प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. तसेच याअगोदर दिव्यांग व्यक्तीला महिन्याला 600 रुपये देण्यात येत होते.

मात्र 40ते 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला 800 रुपये तर 80 ते 100 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला 1000 रुपये वाढ झाली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना 21 हजार रुपये उत्पन्नाच्या दाखला असलेली शर्त आता 50 हजार रुपये केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, नवीन लाभार्थ्यांनी व ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)