खटावमध्ये सोमवारी अधिकारी-ग्राहक पंचायत बैठक

वडूज, दि. 13 (प्रतिनिधी) – शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायत पदाधिकारी यांची बैठक सोमवार दि. 18 रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.
खटाव तालुक्‍यामध्ये शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायतीच्या बैठका मध्यंतरी खंडित झाल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचे प्रश्न सुटू शकत नव्हते. त्यासाठी प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. या बैठका सुरु झाल्याने ग्राहकांच्या समस्या वेळेत सुटण्यास मदत होणार आहे. या बैठकीसाठी ग्राहकांनी आपल्या समस्या दोन प्रतिमध्ये हस्ताक्षरात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात. या बैठकीस खटाव तालुका ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्राहक यांनी विजवितरण, दूरध्वनी, बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, शिक्षक, बॅंक, पतसंस्था, व्यापारी, पुरवठा विभाग, पोलीस स्टेशन आदींच्या बाबतीत समस्या मांडवायच्या असल्याचे आवाहन ग्राहक पंचायतीच्या प्रांत संघटक यशोधरा पेठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)