खटावच्या दुष्काळावरून विधानसभेत आमदार आक्रमक

आ.शशिकांत शिंदे,आ.जयकुमार गोरे,आ.बाळासाहेब पाटील आक्रमक; अधिवेशन चालु न देण्याचा इशारा

सातारा :
कायम टंचाईग्रस्त असणाऱ्या खटाव तालुक्‍याला राज्यशासनाच्या दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याने तालुक्‍याचे तीनही लोकप्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाले. विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आ. जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी धरणे देवून ” खटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ” तालुक्‍यात दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो ” अशा घोषणा दिल्या.

-Ads-

आमदारांनी खटावमध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणाऱ्या गांधी टोप्या ही परिधान केल्या होत्या.आज हिवाळी अधिवेशनाची मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला. मात्र दुष्काळी उपाययोजना लागू केल्या नाहीत. अनेक तालुक्‍यांना दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ या आमदारांनी निदर्शने केली.

यावेळी आ. जयकुमार गोरे म्हणाले, चुकीच्या सर्वेक्षण आणि निकषांमुळे खटाव तालुल्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे. सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण करणाऱ्या सरकारलाच आता सॅटेलाइटवर पाठविण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने पेरण्या झाल्या नाहीत. खरिप आणि रब्बीचे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत.

पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे सरकारला खटाव तालुका दुष्काळी जाहीर करुन उपाययोजनाही त्वरित लागू कराव्या लागतील. या अधिवेशनातच आम्ही सरकारला तसा निर्णय घ्यायला भाग पाडू. अशा इशारा आ.शशिकांत शिंदे,आ.बाळासाहेब पाटील,आ.जयकुमार गोरे यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
20 :thumbsup: Thumbs up
29 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)