खटल्यासंबंधी माहिती थेट “स्क्रीन’वर

वकील, पक्षकारासह शिपायाचे काम होणार सोपे

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयांच्या बाहेर “स्क्रीन’ बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे वकील, पक्षकारांचे काम सोपे होणार असून, न्यायालयातील शिपायांवर पडणारा ताण कमी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने देशामध्ये क्रांती घडविली आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत असून, शासकीय कामकाजामध्ये देखील या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये तर या तंत्रज्ञानामुळे न्यायालयीन कामकाज अत्यंत सोपे झाले आहे. व्हिडीओ कॉन्फरसींगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सातासमुद्रापार असणाऱ्या नागरिकांना न्यायालयात उपस्थित न राहता देखील घटस्फोट मंजूर झाल्याच्या घटना न्यायालयात घडल्या आहेत. जिल्हा न्यायालयात देखील दिवाणी खटल्यात व्हॉट्‌स ऍपचा वापर करून दावा निकाली काढल्याची घडना गेल्या महिन्यामध्ये झालेल्या लोकअदालतीमध्ये घडली होती.

तासन्‌तास वाट पाहण्यातून सुटका
सध्या जिल्हा न्यायालयामध्ये खटला सुरू होण्यापूर्वी पक्षकार, वकिलांना शिपायामार्फत बोलविण्यात येते. शिपाई कोर्ट हॉलच्या बाहेर येऊन मोठ्या आवाजात वकील, पक्षकाराचे नाव पुकारतात. शिपायाने पुकारल्यानंतर खटला असल्याची माहिती वकील, पक्षकारांना मिळते. मात्र, पुकारेपर्यंत वकील, पक्षकारांना तासन्‌तास न्यायालयाच्या बाहेर वाट पहात बसावी लागते. तसेच एकदा पुकारल्यानंतर वकील, पक्षकार हजर न झाल्यास शिपायाला इतर कामे सोडून वारंवार वकील, पक्षकाराचे नाव पुकारावे लागते. मात्र, यावर तोडगा म्हणून उच्च न्यायालयाच्या धर्तीवर “स्क्रीन’ बसविण्याचे काम सुरू आहे. यावर न्यायालयात सुरू असणाऱ्या खटल्याची माहिती मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)