खचलेल्या रस्त्याला मुरूमाची मलमपट्टी

सातारा – सातारा तालुका पोलीस स्टेशनसमोर असलेल्या गटारातील घाण व गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढून खचलेल्या रस्त्यावर टाकल्याचे सचित्र वृत्त प्ररभातने प्रसिध्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यावर मुरूम टाकण्याचे काम केल्याने आता या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत झाली आहे. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी या रस्त्यावरील गटारामध्ये पाईप टाकण्यात आल्या होत्या.

या रस्त्यावर भर टाकण्यासाठी गटारातल्या गाळाच्या वापराची अजब संकल्पना राबविली आसल्याचे दै. प्रभातने निदर्शनास आणले होते. तालुका पोलीस स्टेशन शेजारून चिरायू हॉस्पिटलकडे जाण्याच्या मार्गावरील रस्त्यामधील सांडपाणी व्यवस्थेसाठी या आधी देखील अनेक वेळा पाईप टाकण्याचे काम केले होते. काल या गटारातील गाळ काढून तो रस्त्यावर भर म्हणून टाकण्यात आला होता. मुळात आजपर्यंत रस्त्याला खड्डे पडल्यावर मुरूम किंवा खडी अथवा काहीच नसल्यास माती, वापरण्यात येत असे. मात्र या रस्त्यावर प्रामुख्याने नाल्यातीलच गाळ काढून तो भराव म्हणून टाकण्यात आला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)