खचलेल्या रस्त्याला गटारातल्या घाणीचा आधार

तालुका पोलीस स्टेशन शेजारून चिरायू हॉस्पिटलकडे जाण्याच्या मार्गावर सांडपाणी

गुरुनाथ जाधव

सातारा – सातारा तालुका पोलीस स्टेशनसमोर असलेल्या गटारातील घाण व गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढून खचलेल्या रस्त्यावर टाकल्याचे चित्र दिसत आहे. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सातत्याने या रस्त्यावरील गटारामध्ये पाईप टाकण्यात आला होत्या. आज देखील येथील गटारामध्ये पाईप टाकून सातारा नगरपरिषदेच्या संबंधित विभागाकडून खचलेल्या रस्त्यावर भर टाकण्यासाठी गटारीतल्या गाळाच्या वापराची अजब संकल्पना राबविली आहे.

तालुका पोलीस स्टेशन शेजारून चिरायू हॉस्पिटलकडे जाण्याच्या मार्गावरील रस्त्यामधील सांडपाणी व्यवस्थेसाठी पाईप टाकण्याचे काम केले. या गटारातील गाळ काढून तो रस्त्यावर भर म्हणून टाकण्यात आला असल्याचे दिसत आहे. मुळात आजपर्यंत रस्त्याला खड्डे पडल्यावर मुरूम किंवा खडी अथवा काहीच नसल्यास माती, वापरण्यात येत असे. मात्र रस्त्यावर प्रामुख्याने नाल्यातीलच गाळ काढून तो भराव म्हणून टाकण्याची संकल्पना कोणाच्या सुपीक डोक्‍यातून येते हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

या अगोदर देशमुख कॉलनी येथे देखील याचप्रकारे नाल्यामधील सांडपाणी व्यवस्थापन करताना गटारातील गाळ काढून तो रस्त्यावर भर म्हणून टाकल्याची अधिकृत माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्या रस्त्यावर दुसऱ्या दिवशी मुरूम टाकण्यात आला होता.

शहरातील विविध ठिकाणी गटारे दैनंदिन स्वरूपात प्रभाग निहाय स्वच्छ केली जात असतात. त्यातीलच एक भाग म्हणून सातारा तालुका पोलीस स्टेशन समोर व हॉटेल राजतारा समोर गटार स्वच्छ केली की काय असे वाटले होते. पण प्रत्यक्षात जेसीबीच्या सहाय्याने गटारातील पाईप बसवण्याचे काम करताना त्यातील गाळ काढून पुन्हा ये -जा करायच्या रस्त्यावरच टाकण्यात आला असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)