खंडाळ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

खंडाळा ःतहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना मराठा बांधव.

खंडाळा, दि. 9 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण व विविध प्रलंबित मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान घोषणाबाजी करित मोर्चा काढून खंडाळा तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता. खंडाळा) येथील भिमाशंकर मंदिर येथून मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरुन रॅली काढून काही वेळ ठिय्या मांडला. महामार्गापासून पारगांव – खंडाळा येथील मुख्य मार्गावरून मोर्चा मार्गक्रमण करित असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण, पंचायत समितीमधील स्मृती स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर या महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव व सपोनि हनुमंत गायकवाड यांना लहान मुलांच्या हस्ते देण्यात आले. अत्यावश्‍यक सेवा वगळून पारगाव व खंडाळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी दंगा नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी असा खंडाळा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)