खंडाळ्यातील मच्छिमारांचे आंदोलन मागे

शिरवळ – खंडाळा तालुक्‍यातील भादे, लोणी, भोळी, तोंडल, या वीर धरण जलाशय परिसरातील कातकरी, गोसावी व भोई समाजातील मच्छीमार समाजाने आपल्या विविध मागण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊनसुध्दा योग्य न्याय मिळत नसल्याने बुधवारी, 2 रोजी पासून मच्छिमार समाज बांधव वीर धरण जलाशयात जलसमाधी आंदोलन करणार होते.

तत्पूर्वी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अरुण विधळे यांनी मच्छिमारांना मासिक पास देण्याचे लेखी आदेश ठेकेदाराला दिल्याने जलसमाधी आंदोलन मच्छिमारांच्यावतीने स्थगित करण्यात आले. याबाबत तातडीने आदेशाची प्रत तोंडल, भादे येथील मच्छिमार बांधवांना सातारा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग सातारचे श्रीकांत वारुंजीकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश जाधव यांच्यासह मच्छिमार बांधव उपस्थित होते. आदेशाची प्रत मिळताच मच्छिमार बांधवांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)