खंडाळ्यातही वाळू माफियांना दणका

दोन जेसीबी, दोन डंपर, दोन ट्रॅक्‍टर ताब्यात

लोणंद – खंडाळा तहसीलदार विवेक जाधव यांनी आपल्या महसूल विभागाच्या पथकासह अवैध वाळू उपसा करणाऱ्याना शुक्रवारी पहाटे चांगलाच दणका देऊन दोन जेसीबीसह एकूण सहा वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, मंगळवारी वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी अनधिकृत वाळु उपशावर कारवाई करत 32 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ऐवढ्यावर न थांबता कारवाई नंतरही वाळू ठेकेदारांकडून बेकायदेशीररित्या उपसा सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे संबंधित वाळू माफियांवर मोक्काअंतर्गत कारवाई करता यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मागणीदेखील केली आहे. त्यामुळे वाई तालुक्‍यातील वाळू माफियांचेही धाबे दणाणले असतानाच शुक्रवारी खंडाळ्यातही वाळू उपशावर कारवाई करण्यात आल्याने वाळूमाफियांना चांगलाच दणका बसला आहे.

खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी लोणंदजवळील बाळू पाटलाचीवाडी हद्दीत वाळू तस्करांवर धडक कारवाई करत दोन जेसीबीसह दोन डंपर व दोन ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहेत. बाळू पाटलांचीवाडी येथील खेमावतीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू माफियांकडून वाळू उपसा चालू असल्याचे समजल्याने खंडाळा तहसीलदार विवेक जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये अमोल शेळके, काशीनाथ शेळके आणि पिंटू खरात यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. साधारणपणे या कारवाईमध्ये जवळपास वीस लाख रुपयांपर्यंत दंड वसूल होईल अशी माहिती तहसीलदार विवेक जाधव यांनी दिली आहे. ताब्यात घेतलेली वाहने लोणंद ठाण्यात लावण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)