खंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

मुंबई: साताऱ्याच्या खंडाळ्याहून मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अखेर मागे घेतले आहे. उद्योगमंत्री सुभाष देषमुख यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. या शेतकऱ्यांची उद्या सकाळी 11 वाजता उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे.

दरम्यान, सकाळपासून मानखुर्दमध्ये अडवलेल्या शेतकऱ्यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी या शेतकऱ्यांना वेळ दिली आणि शांततेच्या मार्गाने चाललेले हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)