खंडाळा काल, आज आणि उद्या…

पेठ नावाने ओळखला जाणारा खंडाळा हा औद्योगिक तालुका म्हणून नावारुपास आला. हा अर्धशतकाचा प्रवास थक्क करणारा आहे. याविषयी थोडेसे……

ऐत्याहासिक असणाऱ्या खंडाळा बाबत अनेक अख्यायिका आहेत. खंबाटकी घाटात खामजाई मंदिरावरुन या पेठाचे खंडाळा हे नाव पडले असावे. असे अनेक जाणकारांचे मत आहे. सुरुवातीला वाई हा तालुका तर खंडाळा हा पेठ म्हणून कार्यरत होते. यावेळेचा खंडाळा म्हटले कि, अगदी वाळवंटासारखी अवस्था.

दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला तालुका. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरून पाणी मिळायचे, पाण्याचा टॅंकरच्या मागे पाण्यासाठी पळत राहयचे अशी अवस्था. तर पिकपाणी, पायाभुत सुविधाचा मोठा वाणवा होता. माञ माणुसकीचा झरा कधीही आठला नाही. खंबाटकीत अपघात असो किंवा अन्य अडचणीच्या काळात हरणाच्या वेगाने धावणारा खंडाळकर आजही तसाच जिवंत पाहायला मिळतो. याचा मला अभिमान वाटतो.

1970 च्या दशकात खंडाळा हा तालुका म्हणून घोषित करण्यात आला. आणि खंडाळा येथे तहसील, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालय अधिकृत सुरु करण्यात आले. यावेळी खंडाळाला लोकवस्तीत वाढ होण्यास सुरुवात झाली, माञ तरीही म्हणावा तसा विकास पाहायला मिळाला नाही. माञ 1990 च्या दशकात श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून निरा देवघर व धोम बलकवडी कनॉलचे पाणी शिवारात फिरायला लागले. आणि खंडाळा नंदनवन व्हायला सुरुवात झाली. याच वेळी अनेक मोठ्या मोठ्या 165 कंपन्यांनी खंडाळा, शिरवळ, लोणंद परिसरात आपले बसस्थान बसवले.

परिणामी छोट्या कंपन्या, मोठे गृहप्रकल्प यांनी आकार घेतला, खंडाळातून पुणे-बंगलोर सहा पदरी रस्ता रुंदीकरण महामार्ग, कनॉल मुळे वाढती सिंचन क्षमता, पुण्यासारखी मोठी बाजारपेठ यामुळे शिरवळ-खंडाळा हे उद्याचा पिंपरी-चिंचवड असल्याचे ठामपणे अधोरेखित झाले आहे. आणि या पारगाव खंडाळाचा मी एक रहिवासी असल्याने याचा साक्षीदार असल्याचा अभिमान आहे.
– नारायणराव बळवंतराव पाटील 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)