खंडपीठाच्या मागणीसाठी आता पक्षकार रस्त्यावर

शनिवारी केले शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर लाक्षणिक आंदोलन

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आता पक्षकार मैदानात उरतले आहेत. पक्षकारांनी शनिवारी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ लाक्षणिक आंदोलन केले. “पुणे येथे खंडपीठ झालेच पाहिजे’ या आणि अशा विविध घोषणा यावेळी पक्षकारांनी दिल्या. पुणे नवनिर्माण सेना आणि पक्षकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात फेब्रुवारीमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथील वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे पुण्याला खंडपीठ मिळणार नसल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यावर पुणे जिल्हा बार असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत एक दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर पालकमंत्री गिरीष बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यास एका महिना उलटल्यानंतरही अद्याप खंडपीठाबाबत काहीच कृती झालेली नाही. त्यामुळे पक्षकारांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यातील पक्षकारांना मुंबईजवळ असल्याचे कारण देत खंडपीठाची मागणी डावलण्यात येत आहे. मात्र, प्रकरणांची संख्या लक्षात घेता कोल्हापूरपेक्षा पुण्यात खंडपीठ होणे गरजेचे आहे. त्यामागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून त्यास पुणे बार असोसिएशनचा पाठिंबा असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अजय पैठणकर यांनी दिली. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडावळे, सचिव राजेंद्र बागणे, सदस्य सुर्यकांत भागवत आणि सुरेश पारखे यांच्यासह अनेक पक्षकार आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी त्यांचे मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीशांनना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)