खंडणी वसुल केल्याप्रकरणात एकावर मोक्का

न्यायालयाने सुनावली त्याला पोलीस कोठडी

पुणे – भंगाराचे टेंडर भरायला लावून वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत 38 लाख रूपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी एकावर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय 47, रा. प्रतापसिंहनगर, खेड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पैलवान (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही), शुकराज पांडुरंग घाडगे, शामराव तिवारी, कुमार खत्री यांच्यासह इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इक्‍बाल सय्यदतालीब हुसेन (वय 48, रा. भुईज, ता. वाई, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली.
डिसेंबर 2017 मध्ये किसनवीर सहकारी साखर कारखाना येथील भंगार मालाचे टेन्डर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या मालाची माहिती घेण्यासाठी इक्‍बाल हुसेन हे त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांची आरोपींशी ओळख झाली. त्यानंतर शुक्रराज घाडगे याने हुसेन यांची दत्ता जाधव यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी जाधव याने टेडरच्या बदल्यात हुसेन यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी 10 लाख देण्याचे हुसेन यांनी मान्य केले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणीपोटी 38 लाख रुपये वसुल केले. या प्रकरणी जाधव याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील विकास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनाविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)