खंडणी उकळणाऱ्या सराईतावर गुन्हा

पिंपरी – रूग्णालयात उपचार घेत असतानाही आपल्या टोळीच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकाकडून सहा महिन्यांपासून साडेतीन लाखाची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगार संतोष कुरावत याच्यासह सहा जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तीन जणांना पिंपरी पोलीसांनी गजाआड केले असून दोन जण पसार आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी याबाबत माहिती दिली. सचिन राकेश सौदाई (वय-32) ओंकार प्रकाश मेढेकर (वय-26) आणि नदीम ताजुद्दीन मनेर (वय-20, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सनी राकेश सौदाई (वय-26) आणि प्रशांत (पूर्ण नाव-पत्ता समजू शकला नाही) हे दोघे पसार आहेत. तर, सराईत गुन्हेगार संतोष अशोक कुरावत (वय 32) हा रूग्णालयात उपचार घेत आहे. कुरावत यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुरावत हा खून प्रकरणात जामिनावर बाहेर आलेला असताना 15 सप्टेंबर 2017 रोजी चार जणांनी पिस्तुलातून चार गोळया झाडून खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात कुरावत गंभीर जखमी झाला होता. खंडणी प्रकरणाची सर्व सुत्रे तो रूग्णालयातून हलवित होता.

याप्रकरणी विक्रम पेशुराम बखत्यारपुरी (वय-29, रा. रहाटणी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम यांचे पिंपरी कॅम्पात हॉटेल आहे. या टोळीने गेल्या सहा महिन्यांपासून विक्रम आणि त्यांच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन आतापर्यंत साडेतीन लाख रूपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पुन्हा 9, 10 आणि 11 जून रोजी कुरावत आणि सचिन सौदाई यांनी वारंवार वेगवेगळ्या मोबाईलवरून विक्रम यांच्याकडे दोन लाख रूपयांची खंडणी मागितली. अखेर विक्रम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी सापळा रचला. त्यानुसार, विक्रम यांनी आरोपींना खंडणीची रोकड घेण्यासाठी हॉटेलवर बोलविले. दोन लाख रूपयांपैकी 60 हजार रूपये स्विकारताना तीन जणांना रंगेहाथ पकडले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)