खंडणीसाठी टोळक्‍याचा धुडगूस

पिंपरी – बिल्डरकडून खंडणी मिळवून दिली नाही म्हणून दुकानात घुसून टोळक्‍यांनी धुडगूस घालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाकड येथे शुक्रवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी अमरपाल परमानंद सिंग (वय-65, रा. ओमेगा कमर्शियल कॉम्प्लेक्‍स, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राजेश सोमशेखरन पिल्ले व त्याच्या 20 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमरपाल हे ओमेगा प्रमोटर्स्‌ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी वाकड येथे ओमेगा कमर्शिअल नावाने इमारत बांधली असून त्यातील दुकान क्रमांक 39 ते 43, 23, 24 हे दुकानदारांना विकले आहेत. मात्र आरोपींनी संबंधीत दुकानदारांना अमरपाल यांच्याकडून 15 ते 20 लाख रुपये मागावेत व ते पिल्ले याला मिळवून द्यावेत अशी वारंवार मागणी केली. मात्र मागणी पूर्ण होत नाही असे दिसताच पिल्ले व त्याच्या 20 साथीदारांनी ओमेगा कमर्शियल मधील दुकानदार नरेंद्र पनपालीया यांना धमकीही दिली व त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, धमकी देणे व दहशत पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)