खंडणीसाठी टीव्ही मालिकेच्या सेटवर ग्रामस्थांचा हल्ला

शुटींगचे साहित्य आणि मोटारीची तोडफोड


करवीर पोलिसांनी केली 9 जणांना अटक

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्‍यातील केली गावात सुरू असणाऱ्या “जुळता जुळता जुळतंय की’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर गावकऱ्यांनी खंडणीसाठी

हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावात सुरू असणाऱ्या शूटिंगच्या बदल्यात खंडणी देण्याची मागणी करत केलीचे उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी धिंगाणा घातला आणि शुटींगच्या साहित्यासह मोटारीची तोडफोड केली. त्याचबरोबर दिग्दर्शकास मारहाण करून धमकी देण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी उपसरपंच अमित पाटीलसह नऊ जणांना अटक केली आहे.
केली गावात कॅप्टन माने यांच्या बंगल्यात गेल्या दोन दिवसापासून मालिकेचे शुटींग सुरू आहे. रवींद्र सिद्धू गावडे (वय 36, रा. हॉकी स्टेडिअम परिसर) हे त्याचे निर्मिती प्रमुख म्हणून तर मुंबईतील गौतम कोळी हे दिग्दर्शक म्हणून काम करतात.

गावात चित्रीकरण करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अशी मागणी उपसरपंच पाटीलने गावडे यांच्याकडे केली. पण खंडणी स्वरुपातील रक्कम देण्यास गावडे यांनी नकार दिला. याचा राग पाटीलला आला. काल रात्री पावणे दहाच्या सुमारास येथील शुटींग सुरू होते. दरम्यान उपसरपंच पाटील साथीदारांसह या बंगल्यात घुसला आणि त्यांनी सेटवरील लाईट व फ्रेम पाडून शुटींग बंद पाडले. त्यानंतर दिग्दर्शक कोळी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. बंगल्याबाहेरच्या आलिशान मोटीरीचीही तोडफोड केली आणि आरडाओरडा करत त्यांनी धिंगाणा घालण्यास सुरवात केली.

हा प्रकार पाहून सेटवरील कलाकारांसह कर्मचारी घाबरून गेले. त्यांनी बंगल्यातील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. त्यात महिला कलाकारांचाही समावेश होता. निर्मिती प्रमुख गावडे यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली.
उपसरपंच अमित भिमराव पाटील, दगडू देवाप्पा कांबळे, किरण सुरेश कांबळे, चंद्रकांत मारुती कोपार्डे, अक्षय हंबिरराव पाटील, अवधुत हंबिरराव पाटील, अमित पंडित मोहिते, कपील आकाराम माने, रवींद्र आनंदा पाडेकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)