खंडणीप्रकरणी कोरेगाव भीमाचा माजी सरपंच गजाआड

शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) नजीक असलेल्या वाडागाव येथील कंपनीमध्ये “कामगारांचा ठेका दे, नाहीतर महिन्याला वीस हजार रुपये खंडणी दे’ या कारणावरून कंपनी व्यवस्थापकाला जीवे ठार मारण्याच्या हेतून हल्ला करत, पिस्तुलीने मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश फडतरे याच्यासह दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पॅकोलाईन कंपनीचे व्यवस्थापक ताहीर मोमीन यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच गणेश फडतरे याच्या मुसक्‍या आवळून शिक्रापूर पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी ताहीर मोमीन हे 3 ऑगस्ट रोजी दुपारी कंपनीमध्ये असताना कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश फडतरे आणि भरत गव्हाणे दोघेजण कंपनीच्या गेटवर गेले. व्यवस्थापक ताहीर मोमीन यांना फोन करून आम्ही गेटवर आलो आहे. तुम्हाला भेटायचे म्हणून आतमध्ये गेले. आत गेल्यावर दोघांनी मोमीन यांना “आम्हाला वीस कामगार लोकांचा ठेका द्या’, असे सांगितले. त्यावेळी मोमीन यांनी आम्हाला कामगारांची गरज नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा कळवू, असे सांगितले. त्यावेळी फडतरे याने “तुला जर कामगारांचा अथवा दुसरा कसला ठेका देता येत नसेल तर, आम्हाला प्रत्येक महिल्याना वीस हजार रुपये खंडणी द्यायची, असे सांगितले. तेव्हा मोमीन यांनी “मी खंडणी देऊ शकत नाही. परंतु जेव्हा कामगारांची गरज पडेल तेव्हा तुम्हाला कळवू, असे सांगितले. त्यांनतर फडतरे आणि गव्हाणे दोघे निघून गेले. त्यांनतर 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोमीन हे त्यांच्या कारमधून घरी जात असताना ते कंपनीपासून पुढे पुणे-नगर रस्त्याजवळ आले असता त्या ठिकाणी त्यांना नंबर नसलेली परंतु मागे सरपंच नाव लिहिलेली एक कार दिसली. त्याचेसमोर गणेश फडतरे, भरत गव्हाणे, प्रसाद ढगे हे तिघे उभे दिसले. त्यावेळी तिघांनी देखील मोमीन यांची कार आडवून बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी गणेश फडतरे याने स्वतः मोमीन यांची कार बंद करून त्यांना खाली उतरवले. भरत गव्हाणे याने ‘तुला आम्हाला ठेका किंवा हप्ता द्यायला काय होते’ असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी भरत गव्हाणे आणि प्रसाद ढगे या दोघांनी मोमीन यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी गणेश फडतरे याने मोठा दगड घेऊन हा आपल्याला काहीच देत नाहीतर याला जिवंत ठेवायचे नाही, असे म्हणून दगड मारला. त्यावेळी मोमीन यांनी तो दगड अडवला असता त्याच्या पाठीत दगड लागला. भरत आणि प्रसाद यांनी मोमीन यांना धरून ठेवले. तर, गणेश फडतरे याने त्यांच्या जवळील पिस्तुल काढून ते उलटे धरून ताहीर मोमीन याच्या डोक्‍यात मारले. त्यावेळी त्या ठिकाणहून जाणारे काही लोक तेथे थांबले असता तिघे देखील पळून गेले. त्यांनतर तेथील दोन नागरिकांनी मोमीन यांना वाघोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत पॅकोलाईन कंपनीचे व्यवस्थापक ताहीर कासम मोमीन (रा. धानोरी विमाननगर, पुणे मूळ राहणार कडूस, ता. खेड, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे, भरत शहाजी गव्हाणे, प्रसाद ढगे (सर्व राहणार कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर खंडणी, शिवीगाळ, मारहाण, दमदाटीप्रकरणी गुन्हे दाखल केला. त्यानंतर काही तासात शिक्रापूर पोलिसांनी गणेश फडतरे यास गजाआड केले. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर करीत आहेत.

  • गणेश फडतरे अनेक गुन्हे दाखल
    कोरेगाव भीमा येथे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला माजी उपसरपंच गणेश फडतरे हा येथील एका ग्रुपशी संबंधित असून त्याचेवर यापूर्वी मारामारी शिवीगाळ, दमदाटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी दंगल घडविल्याबाबत गुन्हे दाखल होते. तर त्यांनतर लगेचच एप्रिल महिन्यात दारू दिली नाही म्हणून एकाला पिस्तुलने मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात त्याने अटकपूर्व जामीन मिळविला होता. तर आता पुन्हा गंभीर गुन्हे त्याचेकडून होत असल्याने शिक्रापूर पोलीस आता काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)