खंडणीची रक्कम उकळल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबीत

पुणे – खंडणीच्या पैशातील 2 लाख 40 हजाराची रक्कम गस्तीवर असताना घेऊन गेल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी सोमवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

अशोक जकाप्पा मसाळ व सुरेश सोमलिंग बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी राहूल मनोहर कटमवार या अभियंत्याचे वानवडी येथून चार अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्याला गाडीतून पुणे स्टेशन, नाना पेटे, सेव्हन लव्हज चौक आणि कात्रज येथे पिस्तुलाचा धाक दाखवून फिरवले होते. यानंतर त्याच्याकडून 14 लाख 30 हजाराची रक्कम घेऊन अपहरणकर्त्यांनी पळ काढला होता. दरम्यान गस्तीवर असणाऱ्या मसाळ व बनसोडे यांना आरोपी कात्रज येथे कार घेऊन थांबलेले दिसले. त्यांनी अपहरणकर्त्यांना याची विचारणा करताच त्यांनी जमिनीच्या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी थांबलो असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मसाळ व बनसोडे यांना खंडणीच्या रकमेतील 2 लाख 40 हजार रुपये दिले. यासंदर्भात फिर्यादीने सह आयुक्तांना भेटुन याची माहिती दिली होती. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. दरम्यान आरापी सापडले नसले तरी खंडणीच्या रकमेतील पैसे घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध सुरू झाला. त्या दिवशी गस्तीवर असणाऱ्या मसाळ व बनसोडे यांनी पैसे घेतल्याचे कबूल करून ते कात्रज येथील लॉकरमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यांचे लॉकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) चव्हाण यांनी पंचासमक्ष उघडले असता त्यामध्ये रोकड सापडली. बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)