खंडणीखोर महिलेवर कारवाई करा अन्यथा आंदोलन

चाकण- शहर व परिसरामध्ये महिला अत्याचार व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल होऊनही अद्याप कायदेशीर कारवाई झालेली नाही. या महिलेवर येत्या सात दिवसांत कायदेशीर कारवाई न झाल्यास येथील खेड तालुका सकल मराठा समाज व श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासह चाकण पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्रही चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना दिले आहे.
चाकण शहर व परिसरामध्ये संगीता वानखेडे ही महिला खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करून खंडणी उकळण्याचे काम करीत आहे. संबंधित महिला पैसे न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देते. या महिलेने आजपर्यंत अनेक व्यक्‍तींवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांची चौकशी करण्यात यावी व या महिलेवर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पत्रात केली आहे. येत्या सात दिवसांत संबंधित महिलेवर कायदेशी कारवाई न झाल्यास खेड तालुका सकल मराठा समाज व श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पत्रावर खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मनोहर वाडेकर, कुशल जाधव, अनिल सोनवणे, अतुल नाणेकर, भालचंद्र पिंगळे, सोमनाथ बिरदवडे, मनोज खराबी, गोरख शेलार, संगीता नाईकरे यांनी सह्या केल्या आहेत. या पत्राच्या प्रति पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी पुणे, प्रांताधिकारी खेड व गृह मंत्रालयास पाठविण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)