क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा क्रिकेट बेसिक्‍सवर विजय 

पुणे – क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने क्रिकेट बेसिक्‍स संघावर 90 धावांनी विजय मिळवताना चौदा वर्षांखालील 21 षटकांच्या लिटल मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. येथील एनसीएल मैदानावर हा सामना पार पडला.
क्रिकेट बेसिक्‍सच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने निर्धारित 21 षटकांत एक गडी बाद 175 धावा फटकावल्या. विजयासाठी 176 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या क्रिकेट बेसिक्‍स संघाला निर्धारित 21 षटकांत केवळ 4 बाद 85 धावांचीच मजल मारता आली.

अवांतर 30 धावांनी बेसिक्‍सच्या धावसंख्येत सर्वाधिक वाटा उचलला. त्यांच्या फलंदाजांपैकी यश घारेने सर्वाधिक 20 धावांचे योगदान दिले. क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या प्रणव केळकरने 18 धावांत सर्वाधिक 3 बळी घेतले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या सलामीवीर क्रिश शहापूरकरने 79 चेंडूंचा सामना करताना नाबाद 100 धावा केल्या, तर दुसरा सलामीवीर साहिल कडने 38 चेंडूंत 45 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. या जोडीने 117 चेंडूंत 161 धावांची भागीदारी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)