क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाला विजेतेपद

चौदा वर्षांखालील लिटल मास्टर्स क्रिकेट स्पर्धा

पुणे दि. 23 – क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने संजय क्रिकेट ऍकॅडमी संघावर 74 धावांनी विजय मिळवताना चौदा वर्षांखालील लिटल मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यावेळी नाबाद 93 धावांची खेळी करणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या क्रिश शहापूरकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

-Ads-

एनसीएल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात संजय क्रिकेट ऍकॅडमी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने निर्धारित 25 षटकांत चार गडी बाद 172 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या संजय क्रिकेट ऍकॅडमीच्या संघाला निर्धारित षटकांमध्ये केवळ 7 बाद 98 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे त्यांना 74 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

संजय क्रिकेट ऍकॅडमीच्या फलंदाजांपैकी स्वजय सुतारने सर्वाधिक 26 धावांचे योगदान दिले. तर शार्दूल विनोदे, शौनक श्रीखंडे व विवान व्यास यांनी अनुक्रमे 11, 15 व 13 धावा करत त्याला साथ दिली. परंतु त्यांचा डाव 7 बाद 98 धावांवर रोखला गेला. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या रुद्र मगरदेशमुखने 15 धावात तीन गडी बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या सलामीवीर क्रिश शहापूरकरने 73 चेंडूंचा सामना करताना नाबाद 93 धावा करत स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. तर दुसरा सलामीवीर साहिल कडने 31 चेंडूंत 37 धावा करताना त्याला सुरेख साथ दिली. यावेळी संजय क्रिकेट ऍकॅडमीच्या शार्दूल विनोदेने 17 धावा देत दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक-

अंतिम सामना- क्‍लब ऑफ महाराष्ट्र- 25 षटकांत 4 बाद 172 (क्रिश शहापूरकर नाबाद 93, साहिल कड 37, शार्दूल विनोदे 17-2) वि.वि. संजय क्रिकेट ऍकॅडमी- 25 षटकांत 7 बाद 98 (स्वजय सुतार 26, रुद्र मगरदेशमुख 15-3).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)