क्‍लब ऑफ महाराष्ट्राने केला वेरॉक संघाचा पराभव

पुणे, दि. 14 -स्टार स्पोर्टस अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या स्टार प्रीमियर लीग स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात जठार अथर्व, वेदांत दारवटकर, यांच्या कामगिरीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्राने वेरॉक संघाचा 38 धावांनी पराभव केला. सामन्यात पाच बळी मिळविणारा जठार अथर्वला सामानावीराच्या खिताबाने गौरवण्यात आले.

क्‍लब ऑफ महाराष्ट्राच्याने विजयासाठी ठेवलेले 141 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेरॉक संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर फलंदाज विवेक फक्त एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर त्यांच्या संघाची भंबेरी उडाली. त्यांची मधली फळी कोलमडली. बी. कबीर (41) वगळता अन्य कोणताही फलंदाज सामन्यात छाप पोडू शकला नाही. त्यांचे आठ फलंदाज दोन आणखी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. अथर्वने पाच बळी मिळवत त्यांचे कंबरडे मोडले तर त्याला साहील कड ने 2 बळी मिळवत सुरेख साथ दिली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या कळंब ऑफ महाराष्ट्रच्या संघाची सुरुवात चांगली झाली. त्यांचे सलामीवीर क्रिश श्‍शपूरकर आणि साहील कड यांनी संयमी पण चांगली सुरुवात केली. ते दोघे बाद झाल्यावे त्यांचा डाव डगमगला. त्यानंतर तेजस गव्हाणे आणि वेदांत दारवटकर याने संघा डाव सावरला. ते दोघे बाद झाल्यावर त्यंचा डाव पुन्हा गडगडला . 140 या सन्मानजनक धावसंख्यापर्यंत मजल मरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)