क्‍लब ऑफ महाराष्ट्रची आगेकूच

पुणे: क्‍लब ऑफ महाराष्ट्र आणि पिवायसी हिंदू जिमखानाच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.

यावेळी झालेल्या पहिल्या सामन्यात क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 7 गडीबाद 132 धावांची मजल मारुन हेमंत पाटील एलेव्हन संघासमोर विजयासाठी 133 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना हेमंत पाटील एलेव्हन संघाला निर्धारीत 20 षटकांमध्ये आठ गडीबाद 126 धावांचीच मजल मारता आल्याने सहा धावांनी पराभुत व्हावे लागले.

यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून राज उंद्रेने 29 तर युवराज झगडेने 21 आणि अतुल विटकरने 26 धावांची खेळी केली. तर, हेमंत पाटीलच्या ऍलन रॉड्रीक्‍झने 19 धावांत तीन गडी बाद केले. तर, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या हेमंत पाटेलसंघाच्या अमेय सोमनने 40 चेंडूत 56 धावांची खेळी करुन एकाकी लढत दिली. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या निकित धुमाळने 20 धावांत 3 गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

तर, दुसऱ्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 199 धावांची मजल मारताना एचके बाऊंस संघासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना एचके बाउन्स संघाचा डाव केवळ 91 धावांमध्येच आटोपला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)