क्‍लब ऑफ महाराष्ट्रचा पुणे इन्स्टिट्युटवर विजय

मांडके करंडक क्रिकेट स्पर्धा

पुणे – येथील विराग क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात सुरू असलेल्या, 14 वर्षांखालील मुलांसाठीची मंडके करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गटसाखळी फेरीतील पहिला सामना क्‍लब ऑफ महाराष्ट्र (सीओएम) आणि पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेट (पीआयओसी) यांच्या दरम्यान झाला. या सामन्यात क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने सुरुवाती पस्सोन वर्चस्व राखत विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली.

-Ads-

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रने निर्धारीत 20 षटकांत बिनबाद 144 धावा करत पुणे इन्स्टिट्युट समोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पुणे इन्स्टिट्युटच्या संघाला निर्धारीत 20 षटकांमध्ये सर्वबाद 124 धावाच करता आल्याने त्यांना सामन्यात 21 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

सामन्यात पुणे इन्स्टिट्युट कडून राहुल नाईकने एकाकी लढत देत सर्वाधीक 44 धावा केल्या त्याला ईतर फलंदाजांनी साथ न दिल्याने त्याला आपली खेळी विजयीखेळीत परावर्तीत करता नाही आली. राहुल नंतर पुणे इन्स्टिट्युट कडून सर्वाधीक धावा होत्या त्या अतिरिक्त धावा,क्‍लब ओफ महाराष्ट्रच्या गोलंदाजांनी सामन्यात तब्बल 27 अतिरीक्त धावा दिल्या ज्यात 18 वाईड बॉलचा समावेश होता. तर पुणे इन्स्टिट्युटच्या राहुल वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रकडून मगर देशमुखने 17 धावा देत तिन गडी बाद केले तर सहिल कडने 33 धेवा देत दोन बळी मिळवले.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या सलामीवीर क्रिश शहापुरकरने नाबाद 69 धावांची खेळी केली तर साहिल कडने नाबाद 41 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. क्रिश आणि साहील यांनी सामन्यात नाबाद 144 धावांची भागीदारी करत प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी पुणे इन्स्टिट्युटच्या गोलंदाजांनी सुमार कामगीरी करताना सामन्यात तब्बल 34 अतिरिक्त धावा दिल्या, ज्यात 25 वाईड आणि 4 नोबॉलचा समावेश होता. सामन्याती क्रिश शहापुरकरच्या नाबाद 69 धावांच्या खेळी मुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)