क्षेपणास्र, अणवस्त्रांनी भारत सुसज्ज

राजगुरुनगर- इस्त्रो आणि डीआरडीओ या संस्थांमध्ये शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्र व अणवस्त्रांनी भारत सुसज्ज व स्वयंपूर्ण झाला आहे. जगातील एक महासत्ता म्हणून त्याने स्वत:ची क्षमता विकसित केली असल्याचे गौरवोद्गार डीआरडीओचे शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी काढले.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना देवधर बोलत होते. याप्रसंगी शैलेजा बुट्टेपाटील, संस्था संचालक बाळासाहेब सांडभोर, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, मा.जि.प.सदस्य अनिल राक्षे, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, प्रसिध्दी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी इस्त्रो आणि डीआरडीओमध्ये संरक्षणासंदर्भात होत असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्राह्मोस अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती व कार्यक्षमतेबद्दल माहिती देताना भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करताना सुमारे 12 हजार कि.मी.पर्यंतच्या टप्प्यात मारा करणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित केली असल्याचे सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांची नावे भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या पंचमहाभूतांच्या नावावरून ठेवली आली आहे. नाग क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान अमेरिकेकडे नसल्याचे ते म्हणाले. या क्षेपणास्त्रांचा वापर हवेतून करता येणार असल्याने भारत संरक्षणाच्या बाबतीत स्वयंसिद्ध झाला आहे. सुखोई, तेजस या हलक्‍या लढाऊ विमानांबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. कारगिलच्या लढाईत बोफर्स तोफांमुळे लष्कराला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डीआरडीओने केलेल्या संशोधनाबाबत त्यांनी एक ध्वनिचित्रफित दाखविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय बोऱ्हाडे यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शिरसी यांनी तर आभार कु.श्नध्दा गुंजाळ हिने मानले.

  • … त्यामुळे भारतावरील बंधने मागे
    पोखरणच्या अनुचाचणीनंतर जगाने भारतावर जी बंधने लादली होती ती त्यांनी भारताची संरक्षणाची ताकद आणि बाजारपेठ पाहून स्वत:हून मागे घेतली. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवली तर जग आपला नक्कीच सन्मान करील असे त्यांनी सांगितले. भारत क्षेपणास्र व अणवस्रांनी सुसज्ज होण्यात डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा वाटा असून भारत देश स्वतः च्या सामर्थ्यावर जगातील प्रत्येक क्षेत्रात सर्वात पुढे असायला हवा अशी त्यांची भूमिका होती. डॉ. कलामांनी 2020 पर्यंत भारताचे सुवर्णयुगाचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)