क्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांशाठी 239.2 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या एकूण आठ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे.

ही तरतूद करताना महपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयासाठी सर्वाधिक 45.23 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर ड क्षेत्रीय कार्यालयासाठी सर्वात कमी 17.51 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तरतूद मिळविण्यात ह क्षेत्रीय कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या कार्यालयासाठी 43.24 कोटी तरतूद केली आहे. याशिवाय क क्षेत्रीय कार्यालयासाठी 33.91 कोटी, फ क्षेत्रीय कार्यालयासाठी 31.95 कोटी, इ क्षेत्रीय कार्यालयासाठी 26.50 कोटी, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी 20.41 आणि 20.27 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

-Ads-

जेंडर बजेट 40.95 कोटींचे
या अंदाजपत्रकात महिलांनादेखील विशेष स्थान देण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी 40.95 कोटींची तरतूद करण्यात आलअि ाहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)