क्षीरसागर विद्यालयात विविध उपक्रम

संग्रहित फोटो

भिगवण- भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भिगवण (ता. इंदापूर) येथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर विद्यालायात, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या भाषणामधून सर्वांसमोर उभे केले. तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. पी. देवकाते यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनावर माहिती सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच प्रा. ए. ए. सकट, डी. पी. कांबळे, प्रा. वाय. आर. तोरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्यध्यापक पी. बी. पोळ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)