क्षयरोग नियंत्रण कार्य करणाऱ्यांचा सत्कार

पिंपरी – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे क्षयरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यांना टीबीचे नमुने गोळा करण्यासाठी स्कूट बॉक्‍स आणि क्षयरोगाच्या जनजागृतीचे शहरात फलक लावण्यासाठी स्टॅन्डी मोफत देण्यात आली. संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयातील चाणक्‍य सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, रोटरीच्या सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, टी. बी. कन्स्लटंट डॉ. विकास इनामदार, ससून रिसर्च सायंटिस्टच्या डॉ. विद्या मावे, औंध टीबी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे, डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

क्षयरोगाचा जीवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. क्षयरोग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंध स्पर्धाचे पारितोषिक वितरण करण्यातच आला. सूत्रसंचालन किशोर गवळी यांनी केले. चंद्रशेखर सरवदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)