क्षयरोगासाठी आधुनिक उपचार पध्दतीचा लाभ घ्यावा

नगर – “”क्षयरोगावर आता अत्याधुनिक निदान व उपचार पध्दती उपलब्ध आहे. पण, समाजात आजही या रोगाविषयी पुरेशी जागरुकता नाही. या रोगाबाबतच्या अज्ञानामुळे जागतिक स्तरावर असंख्य रुग्णांना उपचारच मिळत नाही. त्यामुळे आता सरकारी आरोग्य संस्थांमध्येच क्षयरोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अचूक व जलद निदान शक्‍य झाले आहे. त्यामुळे रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करणे शक्‍य होते. हे सर्व उपचार सरकारी आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास रुग्णांना वेळीच उपचार करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. सर्वांच्या सहकार्यातून क्षयरोग निर्मूलन शक्‍य आहे,” असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सांगळे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बी. बी. नागरगोजे, डॉ. विनोद काकडे, औषध निर्माण अधिकारी स्वाती ठुबे, मुख्य औषध निर्माण अधिकारी श्‍यामसन तेलधुने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुने, डॉ. भागवत दहिफळे, सुवर्णा बेद्रे, डॉ. शिल्पा चव्हाण, सुमित पेटकर, विपुलकुमार गायकवाड, राजश्री आपटे, दीपाली राठोड, तुकाराम सांगळे, आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्षयरोग विभागास औषध निर्माण अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुध्द पाण्यासाठी आर.ओ.ची भेट देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नागरगोजे म्हणाले की, जगभरात 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. क्षयरोग हा प्राचीन रोगांपैकी एक आहे. आजही या भयावह रोगाचे अस्तित्व टिकून आहे. भारतात क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक कार्यक्रम चालवला जातो. या अंतर्गत नगर जिल्ह्यात चार ठिकाणी उच्च दर्जाचे रोगनिदान करणारे मशिन उपलब्ध आहे. क्षयरोग दिनानिमित्त विविध स्वरूपात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्येही प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून तरुणाईचे प्रबोधन करण्यात येत आहे. क्षयरोगावर मात करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)