क्षमतेपेक्षा जादा गर्दीचा ताण

तलावायन भाग 4

————–

-Ads-

पिंपळे गुरव जलतरण तलाव : लहानग्यांची कुचंबना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलावाला उन्हाळ्याच्या हंगामात लोकांचा प्रतिसाद मोठा असून जलतरण टॅंक अपुरा पडत आहे. या तलावाची क्षमात केवळ 100 लोक एकावेळी पोहू शकतील एवढीच आहे. मात्र सध्या येथे एका बॅचसाठी 400 ते 500 लोक हजेरी लावत आहेत. त्यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांना बराच वेळ बाहेरच ताटकळत बसावे लागत आहे. लहान मुलांची कुंचबना होत असून क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत आहे.

सध्या या जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी लॉकरची व्यवस्था केली असली तरी ती अपुरी आहे. महिला स्वच्छतागृहामध्ये मोबाईल, पर्स व मौल्यवान वस्तू सुरक्षित रहाव्यात म्हणून नवीन लॉकर बसवले जावेत अशी मागणी महिलांनी केली. तसेच महिला स्वच्छतागृहात आरसा लावण्यात यावा असेही महिलांनी सांगितले.

या जलतरण तलावाची क्षमता लहान असल्याने व नागरिकांचा प्रतिसाद जास्त असल्यामुळे येथील व्यवस्थापनावर ताण येत आहे. या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी 1 सुरक्षा रक्षक व 4 जीवरक्षक तैनात असल्याचे दिसून आले. मात्र क्षमतेपेक्षा अधिक लोक येत असल्याने या लोकांवर कामाचा ताण येत असून येथे आणखी कर्मचाऱ्यांची गरज आहे. या तलावातील शॉवरची मोडतोड, शॉवर चोरीला जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच येथे येणारे काही लोक पाण्याचे नळ तसेच सुरु ठेवत असतात. त्यामुळे अनेक वेळा पाणी वाया गेल्याने तलावाला पाणी कमी पडत असते. तसेच येथे येणाऱ्या लोकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

वाखाण्याजोगी स्वच्छता
पिंपळे गुरव येथील जलतरण तलावाची देखभाल व स्वच्छता वाखाण्यासारखी आहे. येथे तलावातील पाणी शुद्धीकरण 24 तास सुरु असते. तसेच तलावातील पाणी हे प्रत्येक 8 दिवसानंरत बदलले जात आहे. या जलतरण तलावाच्या बाथरुम व स्वच्छतागृहाची स्वच्छताही उत्तम आहे. याबाबत जलतरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

नागरिकांच्या मागण्या
– जलतरणाच्या बॅचेस वाढवाव्यात
– येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
– लॉकरची सुविधा वाढवावी
– पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– महिलांसाठी महिला जीव रक्षकांची नियुक्ती करावी
– बसण्यासाठी बाकडे, शेड निर्माण करावी
– हंगामात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)