पुणे – माहिती तंत्रज्ञान सुरक्षा सॉफ्टवेअर उत्पादने व सोल्यूशन्स पुरवठादार कंपनी क्विक हील टेक्‍नॉलॉजीजचा 31 मार्च 2018 अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल आधीच्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत 92.2 कोटी रुपयांवरून 29 टक्‍क्‍यांनी वाढून 118.7 कोटी रुपये झाला आहे. पूर्ण आर्थिक वर्षाचा महसूल आधीच्या वर्षीच्या 300 कोटी रुपयांवरुन 6 टक्‍क्‍यांनी वाढून 318 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नव्वळ नफा चौथ्या तिमाहीत आधीच्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत 22.2 कोटींवरून 122 टक्‍क्‍यांनी वाढून 49.2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पूर्ण आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा आधीच्या वर्षीच्या तुलनेत 53.2 कोटी रुपयांवरून 56 टक्‍क्‍यांनी वाढून 83 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर म्हणाले, वस्तू व विनिमय कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर रीटेल क्षेत्रात भक्कम वाढ अनुभवतो आहोत. आमच्या उद्योग व सरकारी क्षेत्र व्यवसायात 14 टक्‍क्‍याने वाढ झाली असून कंपनी पातळीवरील एकंदर विकासात 6 टक्के वाढ झाली आहे. सायबर हल्ल्‌यांपासून संरक्षण करण्यासाठी हा ब्रॅंड स्वीकारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)