‘क्लासिको’: बार्सेलोनाने उडवला माद्रिदचा ५-१ असा धुव्वा…

काल रात्री ला लीगा मध्ये बार्सेलोना संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर रियाल माद्रिद संघाचा ५-१ असा धुव्वा उडवला. लुईस सुवारेज ची हॅटट्रीक या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. लुईस सुवारेज, फिलीप कॉटिन्हो आणि अटयूरॊ विडाल यांनी बार्सेलोनासाठी गोल नोंदवले तर रियाल गोल मध्यरक्षक मार्सेलो याने नोंदवला.

पहिल्या सत्राची सुरुवात बार्सेलोना संघासाठी उत्तम झाली. दहाव्या मिनिटाला जोर्डी अल्बाने लेफ्ट विंगवर चाल रचली आणि बॉल घेऊन तो विरोधी संघाच्या बॉक्समध्ये गेला. तेथे त्याने डिफेंडर्सना चकवत उत्तम पास कॉटिन्होला दिला. कॉटिन्होने डाव्या पायाने गोल करत बार्सेलोनाला १० व्या मिनिटाला १-० अशीआघाडी मिळवून दिली. त्यानंतर बार्सेलोना संघाचा खेळ आणखी बहरला त्यांनी नंतर अनेक आक्रमणे रचली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लुईस सुवारेजला चुकीच्या पद्धतीने पेनल्टी बॉक्समध्ये अडवल्याने बार्सेलोना संघाला पेनल्टी मिळाली आणि ३०व्या मिनिटाला त्याचे गोलामध्ये रूपांतर करत सुवारेजने बार्सेलोना संघाची आघाडी २-० अशी पुढे नेली. नंतर पहिल्या सत्रात बार्सेलोना संघाने वर्चस्व राहिले परंतु आपली आघाडी वाढवण्यात त्यांना अपयश आले.पहिले सत्र २-० असे बार्सेलोना संघासाठी चांगले ठरत संपले.

दुसर्या सत्रात रियाल माद्रिद संघ नवीन रणनीती घेऊन उतरला. त्याचा अफायदाही त्यांना लगेच इस्कोने रचलेल्या चालीवर बार्सेलोनाचे डिफेंडर बॉल क्लीयर करू शकले नाहीत. त्याचा फायदा घेत बॉक्समध्ये असलेल्या मार्सेलोने गोल करत ५० व्या मिनिटाला बार्सेलोनालाची आघाडी १-२ अशी कमी केली. त्यानंतर रियाल संघाने सामन्यात वर्चस्व स्थापन केले. परंतु, गोल करण्याच्या संधी दडवत दडपण घेतले. मॉड्रीचने मारलेला फटका बार्सेलोनाच्या पोस्टला लागला त्यावेळी बार्सेलोना संघाला नशिबाची साथ मिळाली.

रियालच्या आक्रमणांना उत्तर म्हणून बार्सेलोना संघाने देखील आक्रमक चाली रचायला सुरुवात केली. त्यात सर्जिओ रॉबेर्टोच्या जवळून दिलेल्या पासवर सुवारेजने जबरदस्त शक्तीने हेडर केला आणि त्याला रियालचा गोलरक्षक अडवू शकला नाही आणि ७४ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाने ३-१ अशी आघाडी घेती. नंतर ८२ व्या सुवारेजने आणखी एक गोल करत आपली हॅटट्रीक पूर्ण केली आणि बार्सेलोनाची आघाडी ४-१ अशी वाढवली.

बदली  खेळाडू ८० व्या मिनिटाला मैदानात आलेल्या अटयूरॊ विडालने  बदली खेळाडू म्हणून आलेल्या डेम्बलेने दिलेल्या पासवर ८७ व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत क्लासिकोच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. बार्सेलोना संघाने ५-१ अशी आघाडी मिळवली आणि शेवटी हा सामना ५-१ असा जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)