क्रोएशियाच्या स्टार फुटबॉल खेळाडूची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती

नवी दिल्ली – क्रोएशियाचा विश्वकप हिरो आणि स्टार स्ट्राईकर मारियो मॅन्झुकिक याने ३२ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमधून संन्यास घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त कोएशियच्या फुटबॉल महासंघाने दिले आहे.

यावेळी मॅन्झुकिकने म्हंटले कि, आता माझी वेळ आली आहे. क्रोएशियासाठी मी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आणि क्रोएशियाच्या फुटबॉलच्या मोठ्या विजयात मी योगदान दिले आहे, असे म्हणत त्याने निवृत्ती घेतली आहे.

दरम्यान, फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध क्रोएशियाला २-४ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मॅन्झुकिकने क्रोएशियाकडून आतापर्यंत ८९ सामन्यांमध्ये ३३ गोल केले आहेत. आणि डेवर सूकर नंतर मॅन्झुकिक क्रोएशियामधील सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)