“क्रॉस व्होटिंग’चा आरोप राष्ट्रवादीने फेटाळला

मुंबई- राष्ट्रपती निवडणूकीमध्ये आपल्या पक्षाच्या काही आमदार आणि खासदारांनी “क्रॉस व्होटिंग’ केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेटाळला आहे. “युपीए’च्या उमेदवार मीरा कुमार यांच्याबरोबर आपल्या पक्षाची ताकद कायम असल्यचेही पक्षाचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि त्यांच्या प्रचार कार्यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांनाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे “क्रॉस व्होटिंग’झाल्याच्या अफवांकडे दुरक्ष करायला हवे, असेही मलिक म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या विधानसभेतील 288 सदस्यांपैकी लायक असलेल्या मतदारांपैकी 122 जण भाजपचे आहेत. मात्र “युपीए’च्या 14-15 आमदारांकडूनही कोविंद यांनाच मतदान होईल आणि हा आकडा 205 पर्यंत जाईल, असा दावा भाजपच्या नेत्याने व्यक्‍त केला होता.

राज्यातील बलाबल
विधानसभेमध्ये भाजपा व्यतिरिक्‍त शिवसेनेचे 63, कॉंग्रेस 42, राष्ट्रवादी कॉंग्रेस 41, शेतकरी कामगार पक्ष- 3, बहुजन विकास आघाडी-3, एमआयएम-2 समाजवादी पार्टी, भारिप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येकी एक आणि 7 अपक्ष आहेत. त्याशिवाय लोकसभेच्या 48 खासदारांमध्ये भाजपाचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी कॉंग्रेस-4, कॉंग्रेस-2 आणि एक अपक्ष आहे. तर राज्यसभेमधील एकूण 19 खासदारांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5, कॉंग्रेस-4, शिवसेना 3 आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले) आणि अपक्ष प्रत्येकी एक जण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)