क्रेन ऑपरटेरचा भंगार व्यावसायिकाकडून खून

जुण्या भांडणातून घडली घटना, आरोपी अल्पवयीन, अवघ्या काही तासातच पोलिसांनी लावला छडा
लोणंद, दि. 5 (प्रतिनिधी)
लोणंद पोलीस ठाण्यात हद्दीतील एमआयडीसी रोडवर असलेल्या एका इमारतीत एका क्रेन ऑपरेटरच डोक्‍यात दगड व लोखंडी रॉड घालून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी जवळीच एका भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केला असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. चंद्रकांत अंकुश साळुंखे (वय 32) असे खून झालेल्या जेसीबी ऑपरेटरचे नाव आहे. खून करणारा भंगार व्यावसायिक हा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणंद-शिरवळ एमआयडीसी रोडवर एक इमारत आहे.
मुळचा बारामती तालुक्‍यातील असलेला चंद्रकांत अंकुश साळुंखे हा सध्या लोणंद येथील शेळके वस्तीवर आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास होता. चंद्रकांत हा लोणंद नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेनवर सात वर्षांपासून ऑपरेटर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी जवळीलच एका भगार व्यावसायिक असलेल्या अल्पवयीन मुलासोबत चंद्रकांतची पैशाच्या देवाण-घेवाणीतून वादावादी झाली होती. शनिवारी चंद्रकांत काम करत असलेल्या क्रेनच्या ऑफिसमध्ये झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रकांतच्या डोक्‍यात दगड व रॉडच्या सहाय्याने त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी चंद्रकांतच्या खूनाची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर येवून पाहणी केली. दरम्यान, जयवंत जालिंदर खलाटे (रा. खुंटे) यांनी लोणंद पोलिसांनी फिर्याद दिली. तसेच चंद्रकांतची जवळील भंगार व्यावसायिकासोबत काही दिवसांपूर्वी वादावादी झाल्याची माहिती खलाटे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधित भगार व्यावसायिकाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता. त्याने जुण्याच भांडणाच्या रागातूनच चंद्रकांतचा खून केल्याची कबुली दिली.
घटनास्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली व तपासकामी सातारा येथून श्वान पथकास व ठसे तज्ञ यांस तातडीने तपास कामी पाचारण केल. घटना स्थळी इमारतीच्या आजूबाजूला श्वान पथक घुटमळले. दरम्यान, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गिरिश दिघावकर, सपोनी सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस कॉंस्टेबल श्रीनाथ कदम, संजय देशमुख, सागर बडदे, रोहित गायकवाड, सागर धेंडे आदी कर्मचारींनी सक्षम तपास यंत्रणा राबवून एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार करत आहेत. चंद्रकांतच्या पश्‍चात आई व अपंग वडील तसेच दोन विवाहित बहिणी आहे. चंद्रकांत हा घरातील एकमेव कमवता होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)