क्रेडिट कार्डच्या ऑफरबाबत सजग राहा (भाग-२)

क्रेडिट कार्डच्या ऑफरबाबत सजग राहा (भाग-१)

साधारणपणे क्रेडिट कार्डसाठी आपल्याला नेहमीच कॉल किंवा मेल येत असतात. विविध प्रकारचे ऑफर सांगून कार्ड घेण्यास प्रवृत्त करत असतात. अशा स्थितीत जर आपल्याला खरोबरच क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर आणि यादरम्यान आपल्याला एखाद्या बॅंकेचा कॉल आला तर बॅंक प्रतिनिधीला काही महत्त्वाचे प्रश्‍न विचारा. जेणेकरून योग्य प्रमाणात क्रेडिट कार्डचा लाभ पदरात पडेल. क्रेडिट कार्डचा वापर सध्या वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत शुल्क खूपच कमी झाले आहे. अनेक बॅंका विविध प्रकारच्या आकर्षक सवलती देतात. पेट्रोल-डिझेलची खरेदी असो किंवा ऑनलाईन शॉपिंग असो, क्रेडिट कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. अर्थात कार्ड घेताना त्याची चाचपणी करणे अनिवार्य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वार्षिक शुल्काचे आकलन
क्रेडिट कार्ड लाइफ टाइम फ्री असल्याचे ऑफर आपल्याला काही कंपन्या देतात. याचा अर्थ आपल्याला कार्डसाठी कोणतेही अवांतर शुल्क देण्याची गरज नाही, असा होतो. बहुतांश वेळा अशा प्रकारचे शुल्क हे हायएंड आणि प्रीमियम कार्डवर आकारले जाते. यात अनेक प्रकारचे फिचर असतात. मात्र कधी कधी वार्षिक शुल्कात सवलत दिली जाते. जर ही सवलत लाइफटाइम असेल तर पुन्हा एकदा चाचपणी करा. उदा. वर्षभरात किंवा महिनाभरात ठराविक रक्कमेची खरेदी केल्यास कार्डचे शुल्क आकारले जात नाही. अशावेळी आपण अनावश्‍यक खरेदीच्या मोहात पडतो.

व्याजदराची तपासणी
जेव्हा आपण एखादी खरेदी केल्यानंतर क्रेडिट कार्डने पेमेंट करतो, तेव्हा आपल्याला पैसे भरण्यासाठी काही दिवसाचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीत व्याज आकारले जात नाही. मात्र, आपण वेळेत बॅंकेत पेमेंट केले नाही तर त्यावर जबर व्याज आकारले जाते. हे व्याज वार्षिक 30 टक्के असू शकते. अशा स्थितीत कार्ड खरेदी करण्यापूर्वी व्याजदराची माहिती जाणून घ्या तसेच कालावधीबाबत खातरजमा करून घ्या.

पेनल्टी आणि शुल्क तपासा:
क्रेडिट कार्डचा वापर करताना आकारण्यात येणारा दंड आणि शुल्क पाहून आपण गोंधळून जाऊ नका. जर आपण एटीएमने रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्यावर आपल्याला जबर व्याज मोजावे लागेल. आपण थकबाकीच्या किमान शुल्काचा भरणा न केल्यासही आपल्याला दंड भरावा लागेल. जर आपण परदेशात कार्डचा वापर करत असाल तर परकी चलनात शुल्क आकारण्याची शक्‍यता असते. म्हणून कार्ड घेताना दंड आणि शुल्काची अगोदर माहिती करून घ्या.

– किर्ती कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)