क्रेडिट कार्डच्या ऑफरबाबत सजग राहा (भाग-१)

साधारणपणे क्रेडिट कार्डसाठी आपल्याला नेहमीच कॉल किंवा मेल येत असतात. विविध प्रकारचे ऑफर सांगून कार्ड घेण्यास प्रवृत्त करत असतात. अशा स्थितीत जर आपल्याला खरोबरच क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर आणि यादरम्यान आपल्याला एखाद्या बॅंकेचा कॉल आला तर बॅंक प्रतिनिधीला काही महत्त्वाचे प्रश्‍न विचारा. जेणेकरून योग्य प्रमाणात क्रेडिट कार्डचा लाभ पदरात पडेल. क्रेडिट कार्डचा वापर सध्या वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत शुल्क खूपच कमी झाले आहे. अनेक बॅंका विविध प्रकारच्या आकर्षक सवलती देतात. पेट्रोल-डिझेलची खरेदी असो किंवा ऑनलाईन शॉपिंग असो, क्रेडिट कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. अर्थात कार्ड घेताना त्याची चाचपणी करणे अनिवार्य आहे.

ऑफरचे पुरावे मागा
जर आपण एखाद्या टेलिमार्केटिंग करणाऱ्या मंडळीशी कार्डसंदर्भात बोलत असाल तर त्याच्या ऑफर काळजीपूर्वक ऐका. आपल्याला दिल्या जाणाऱ्या ऑफरची तो जंत्री सादर करेल. मात्र, प्रत्येक ऑफर आपण लक्षपूर्वक ऐकून घ्यायला हवे. कधी कधी ग्राहक ऑफर न समजून घेता कार्ड घेतात. कालांतराने ती ऑफर आपल्याला फायदेशीर नसल्याचे निदर्शनास येते. आणखी एक बाब म्हणजे क्रेडिट कार्ड संपूर्णपणे मोफत असल्याचे ग्राहकांना सांगितले जाते. म्हणजेच त्याचे वार्षिक शुल्क शून्य असल्याचे सांगितले जाते. जर टेलिमार्केटिंग करणारा व्यक्ती यासंदर्भात माहिती देत असेल तर त्याला पुरावा मागा आणि ऑफरची लेखी कॉपी देखील घ्या. कारण केवळ ऑफरचा मारा करत क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्यावर भूरळ पाडतात. मासिक बिलाच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये शुल्क आकारल्याचे आपल्या लक्षात येते. अशा स्थितीत आपण प्रत्येक ऑफरचा लेखी पुरावा मागावा, तरच आपली फसवणूक होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रेडिट कार्डच्या ऑफरबाबत सजग राहा (भाग-२)

खरेदी निश्‍चित करा
आपल्याला फोन करणाऱ्या व्यक्तीचा एकमेव उद्देश हा कार्ड विकणे हाच असतो. अशा स्थितीत तो कोणत्या स्वरूपाचे कार्ड विकत आहे आणि त्या कार्डमधून आपल्याला फायदा होणार आहे की नाही, हे पडताळून पाहा. अन्यथा कंपनीच्या प्रतिनिधींच्या विविध ऑफरने आपण भारावून जातो आणि कालांतराने ते कार्ड फायदेशीर नसल्याचे लक्षात येते.

– किर्ती कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)