क्रेडिटवरील व्याजदर कमी करू

गायकर यांचे आश्‍वास; माध्यमिक सोसायटीत पुरस्कार वितरण
नगर – नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे कामकाज व उपक्रम कौतुकास्पद आहेत. फक्त 9.50 टक्‍याने साडेबारा लाखापर्यंत कर्ज या संस्थेतून शिक्षक सभासदांना उपलब्ध होते. हा आदर्श राज्यात अन्य संस्थांनी घेतला पाहिजे. अतिशय काटकसरीचा व पारदर्शी कारभार करून या संस्थेला खऱ्या अर्थाने शिक्षकांची कामधेनू बनविण्यात आले आहे. याला प्रा.भाउसाहेब कचरे यांचे कुशल नेतृत्व निश्‍चितच कारणीभूत आहे. प्रा. कचरे यांच्या आग्रहानुसार कॅश क्रेडिटवरील व्याज कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा बॅंक नक्की करेल, अशी ग्वाही नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.
नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दत्तू भोकनळ, संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, अध्यक्ष भास्कर कानवडे, उपाध्यक्ष चांगदेव खेमनर, सचिव सोन्याबापू सोनवणे आदी उपस्थित होते.
टेमकर म्हणाले, की आज या संस्थेत होणारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना कायम चांगले शिक्षण घेण्याची प्रेरणा देईल. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि कष्ट महत्त्वाचे असतात. अभ्यास करतानाही एक प्रकारचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. खूप कष्ट केल्यावर मिळणारे यश हे खरा आनंद मिळवून देते. विद्यार्थ्यांनी वडीलधाऱ्यांचे ऐकून त्यांच्या विचारांचा आदर करीत शिक्षणात उत्तुंग भरारी घेतली पाहिजे.
प्रा. कचरे म्हणाले, की माध्यमिक शिक्षक सोसायटीचा कारभार करताना कायम सभासद हिताला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच संस्थेची यशस्वी घोडदौड चालू आहे. संस्थेवरील सभासदांचा असलेला विश्वास व प्रेम हेच कायम चांगले काम करण्यास, चांगल्या योजना राबविण्यास बळ देते.
कानवडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. या वेळी भोकनळ यांनी आपल्या क्रीडा प्रवासाबाबत अनेक उदाहरणांसह माहिती देत उपस्थितांना प्रेरणामंत्र दिला. कल्याण ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष चांगदेव खेमनर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संचालक किशोर जाधव, सुरेश मिसाळ, सुनील काकडे, सुनील वाळुंज, सूर्यकांत डावखर, कल्पना जिवडे, उत्तम खुळे, धनंजय म्हस्के, विनायक उंडे, राजेंद्र सोनवणे, अंबादास राजळे, अप्पासाहेब शिंदे, उत्तम जगताप, केशव गुंजाळ, बाबासाहेब बोडखे, काकासाहेब घुले, शैला जगताप, पुंडलिक बोठे, दिलीप काटे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)