क्रेडाई महिला सदस्यांकडून पाच लाखांची केरळला मदत

पुणे – अतिवृष्टी आणि महापुराने केरळचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी समाजातील विविध स्तरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या महिला सदस्यांनी केरळ रिलीफ फंडासाठी पाच लाख रुपये जमा केले आहेत. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून लवकरच मुख्यमंत्री पूरग्रस्त सहायता निधीमध्ये हा धनादेश जमा करण्यात येणार आहे.

महिला विभागाच्या अध्यक्षा दर्शना परमार यांच्या नेतृत्वाखाली हा निधी एकत्रित करण्यात आला असून यासाठी सातारा, अहमदनगर, बारामती, औरंगाबाद आणि पुणे येथील सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी डॉ. डी. के. अभ्यंकर, सोनिया ओगले, ज्योती ठक्कर, अर्चना बडेरा, मीनाक्षी जमातानी, लीना कुकरेजा, सोनल पोखरणा, यू.के जूलका उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)