क्रेडाईकडून पुण्यात बांधकाम कामगारांना प्रशिक्षण

 राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी सहयोग

प्राधान्याचा विषय…
क्रेडाईने काही ऑफ-साईट्‌स सेंटर्सवर कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्या ठिकाणच्या बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचे आणि अगदीच नवीन आणि अननुभवी कामगार कामावर घेण्याऐवजी या युवकांच्या भरतीसाठी कामगार कंत्राटदारांसोबत करार करायचे अशी ही कल्पना आहे. असे उद्योग स्वत:च प्रशिक्षण सहयोगी म्हणून काम करण्यासाठी पुढे येतात आणि क्रेडाईने स्थापन केलेल्या ऑफ-साईट केंद्रांमधून बेरोजगार युवकांना कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष कामावर घेतात. अकुशल कामांचे प्रशिक्षण 3500 कामगारांना देण्यात आले आहे. ऑफ-साईट कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आणि नोकरभरती यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी सीएसडीसीआयसोबत काम करण्यासाठी एक मोबाइल ऍप विकसित करण्याची प्रक्रिया सध्या क्रेडाई पूर्ण करत आहे.

पुणे -बांधकाम उद्योगातील कौशल्याची तूट भरून काढण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (क्रेडाई) बांधकाम मजुरांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. कुशल या प्रशिक्षण कार्यक्रमासह क्रेडाईने कौशल्याच्या क्षेत्रात 2011 मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून, क्रेडाई 23 राज्यांतील 189 शहरांमधील आपल्या सदस्य विकासकांच्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहे. क्रेडाईने 55 शहरांतील पीएमकेव्हीवाय, आरपीएल, ब्रिज आरपीएल आणि विशेष प्रकल्पांच्या 450 स्थळांवर एक लाखांहून अधिक बांधकाम मजुरांना प्रशिक्षण दिले आहे आणि केवळ पुणे विभागातील 50000 कामगारांना प्रशिक्षण देऊन एक मापदंड स्थापन केला आहे.

भारतात औपचारिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाचे प्रमाण चार टक्के आहे. चीन (47 टक्‍के), ब्रिटन (68 टक्‍के), जर्मनी (74 टक्‍के), जपान (80 टक्‍के) आणि दक्षिण कोरिया (96 टक्‍के) या देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले, या उपक्रमामार्फत, क्रेडाईने पुणे व देशाच्या अन्य भागांतील हजारो बांधकाम मजुरांसाठी प्रशिक्षण सत्रे घेऊन त्यांचे आयुष्य बदलून टाकण्यात यश मिळवले आहे. एक उद्योगांची संघटना म्हणून, उद्योगाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कुशल कामगारांचे महत्त्व आम्हाला उमगले आहे. त्यामुळेच आमचा हा उपक्रम जास्तीत जास्त बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. बांधकाम मजुरांमधील कौशल्य विकास हा गेल्या काही वर्षांपासून प्राधान्याचा विषय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)