क्रूड उत्खनन प्रक्रिया होणार सुलभ

नवी दिल्ली –  व्यापार करण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या धोरणाला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, यशस्वी बोलीदाराला, खाण पट्टे किंवा करार पट्टे बहाल करण्याचे अधिकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आणि वित्त मंत्री यांच्याकडे सुपूर्त करण्याला मान्यता देण्यात आली.

हायड्रो कार्बन एक्‍सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी अंतर्गत हा बोलीदार यशस्वी असला पाहिजे तसेच प्रदत्त सचिव समितीच्या शिफारशींवर आधारित आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोलीनंतर हे खाण पट्टे बहाल करता येणार आहेत. हेल्पअंतर्गत वर्षातून दोनदा खाण पट्टे बहाल करता येणार आहेत. यामुळे हे अधिकार या मंत्र्यांकडे सोपवण्यात आल्यामुळे खाण पट्टे बहाल करण्याच्या निर्णयाला गती येणार असून व्यापार सुलभ निर्णय करण्याला चालना मिळणार आहे हेल्प धोरणांतर्गत प्रदत्त सचिव समिती, बोली मूल्याकंन निकष विचारात घेऊन बोलीदाराशी वाटाघाटी करते आणि केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थविषयक समितीला शिफारस करते.

त्यानंतर ही समिती त्याला मंजुरी देते, ही संपूर्ण प्रक्रिया प्रदीर्घ आणि वेळ घेणारी आहे, व्यापार सुलभ करण्याच्या धोरणाला अनुसरून या प्रक्रियेचा वेळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने 2016 मध्ये शोध आणि उत्पादन क्षेत्रासाठी हेल्प हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)