क्रुडचे दर झाले 75 डॉलर प्रति पिंप

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या किमती येत्या काही दिवसांत गगनाला भिडण्याची शक्‍यता आहे. कारण क्रुडचे दर आता 75 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. सीरियामधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किमती अजून वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

येत्या काही दिवसांत खनिज तेलांच्या किमती 80 डॉलर प्रतिबॅरल होण्याची शक्‍यता आहे. याचा थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या दरांना बसेल व त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किमती 90 ते 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज जगातील मोठ्या रिसर्च कंपन्यांपैकी एक जेपी मॉर्गनने वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)