क्रीडा स्पर्धेत पिसुर्टी शाळेची चमकदार कामगिरी

विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांची बाजी

नीरा- पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये यशवंतराव कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत नीरा बीट पातळीवरील स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या सांघिक स्पर्धेमध्ये पिसुर्टी शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. याचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य गोरखनाथ माने, बाळासाहेब थोपटे, प्रमोद थोपटे, दत्तात्रय पाटसकर, जी. ई. साळुंखे, कैलास नेवसे, अरूणा गरूड, महादेव माळवदकर उपस्थित होते.
विजेत्यांची नावे व गाव पुढीलप्रमाणे 50 मीटर धावणे मुले/मुली: प्रज्वल नितीन पवार- वागदरवाडी (प्रथम), प्रिया दरबार डांगे (थोपटेवाडी). 100 मीटर धावणे मुले/मुली: वैभव किसन राखपसरे-पिंपरे खुर्द (प्रथम), तनिष्का प्रकाश सजगणे-पिंपरे खुर्द (प्रथम). चेंडू फेक मुले/मुली: असलम अकबर शेख-मांडकी(प्रथम), प्रिया दरबार डांगे-थोपटेवाडी (प्रथम). गोळा फेक मुले/मुली: वैभव भिमराव राखपसरे-पिंपरे खुर्द. (प्रथम), अश्विनी दशरथ चव्हाण- राख (प्रथम). उंचउडी उभी: यशराज शांताराम ताटे- राख (प्रथम), समृद्धी सईबाबा निकम-नावळी (प्रथम). उंचउडी धावती मोठा/लहान गट: ओम बापुराव चव्हाण-राख (प्रथम), वैष्णवी पांडुरंग बरकडे- पिसुर्टी(प्रथम), गौरव शामराव थोपटे- थोपटेवाडी (प्रथम), प्रिया दरबार डांगे- थोपटेवाडी (प्रथम). लांब उडी लहान/मोठा गट: अमोल मानसिंग बरकडे- पिसुर्टी (प्रथम), वैष्णवी पांडुरंग बरकडे- पिसुर्टी(प्रथम). वकृत्व लहान/मोठा गट: रोहन प्रमोद भामे- नीरा 1 (प्रथम), वैष्णवी पांडुरंग बरकडे- पिसुर्टी (प्रथम). कबड्डी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-पिसुर्टी (प्रथम), जि.प.प्राथ.शाळा- राख (प्रथम). खो-खो: जि.प. प्राथ. शाळा- पिंपरे खुर्द (प्रथम), जि. प. प्राथ.शाळा- पिंपरे खुर्द (प्रथम). लंगडी:जि. प. प्राथ.शाळा-पिसुर्टी (प्रथम), जि. प. प्राथ. शाळा-पिसुर्टी (प्रथम). लेझीम लहान/मोठा गट: जि.प.प्राथ. शाळा-दौंडज (प्रथम), जि. प. प्राथ. शाळा-वाल्हे (प्रथम), जि. प. प्राथ. शाळा-पिसुर्टी (प्रथम),जि. प. प्राथ. शाळा-पिसुर्टी (प्रथम).
लोकनृत्य लहान/मोठा गट: जि. प. प्राथ. शाळा-वरलामळा (प्रथम), जि. प. प्राथ. शाळा-पिंपरे खुर्द (प्रथम). भजन लहान गट- जि. प. प्राथ. शाळा-वरलामळा (प्रथम) भाऊसाहेब नाझीरकर, कल्पना निगडे, वर्षा पवार, भाऊसाहेब बरकडे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विस्तार अधिकारी सुरेश लांघी यांनी प्रास्ताविक केले. महादेव माळवदकर यांनी सूत्रसंचालन तर सोपान जगदाळे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)