क्रीडा स्पर्धांमुळे मुलांच्या क्रीडा गुणांना वाव : नंद कुमार

सातारा : पश्‍चिम विभागीय सैनिक शाळा क्रीडा स्पर्धा मुलांसाठी मोठा सोहळा असून यातून त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल, असा विश्वास शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी व्यक्त केला.

पश्‍चिम विभागीय सैनिक स्कूल क्रीडा स्पर्धा 2018-19 चे उद्‌घाटन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रधान सचिव नंद कुमार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. शिक्षण विभागाचे उपसंचालक मकरंद गोंधळी, ग्रुप कॅप्टन मनिषा मिश्रा, कर्नल रणजित नलावडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुनिता गुरव, पी. लक्ष्मीकांत आदी यावेळी उपस्थित होते.

नंद कुमार म्हणाले, या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुलांनी आपले क्रीडा गुण दाखवावेत. या क्रीडा स्पर्धेमुळे मुलांना खूप काही शिकायला मिळेल. मुलांनी स्पर्धेत कुठलेही नियम न मोडता प्रमाणिकपणे खेळ करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल यासारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच इंग्रजी आणि हिंदी वादविवाद स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून दाखल होऊ इच्छिणाऱ्या नवयुवकांच्या मनात सौहार्दाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना या क्रीडा स्पर्धेद्वारे रूजवली जाणार असल्याचे ग्रुप कॅप्टन मनिषा मिश्रा यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये सैनिक स्कूल बालाचडी (गुजरात), चित्तोडगढ (राजस्थान), रिवारी (हरियाणा), रिवा (मध्य प्रदेश) व सातारा (महाराष्ट्र) या सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)