क्रीडा शिष्यवृत्तीसाठी खेळाडूंना आणखी एक संधी

31 जानेवारी पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करा – क्रीडा समिती

पुणे  : महापालिकेच्या क्रीडा धोरणा अंतर्गत शहरातील उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. 2019-20 साठी सुमारे 52 खेळाडू या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असले तरी, अनेक खेळाडूंना केवळ काही कागदपत्र सादर करता न आल्याने ते या शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंना ही कागदपत्रे सादर करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी या खेळाडूंना महापालिकेकडून संपर्क साधण्याच्या सूचना यावेळी क्रीडा समिती अध्यक्ष राहूल भंडारे यांनी दिल्या आहेत.
महापालिकेकडून शहरातील उल्लेखनिय कामगारी करणाऱ्या उद्योन्मुख खेळाडूंना 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे 100 अर्ज आले होते. त्यातील 52 अर्ज पात्र झाले असून उर्वरीत 48 अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र, अनेक खेळाडूंना पालिकेने दिलेल्या वेळेत कागदपत्रे सादर न करता आल्याने त्यांनी शहरासाठी योगदान देऊनही या शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच काही खेळाडूंनी महापालिकेने मुदतवाढ द्यावी अशी मागणीही केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर, ज्या खेळाडूंकडे कागदपत्र आहेत.मात्र, केवळ मुदतीत ती त्यांना देता आली नाहीत. त्यांना पुन्हा एकदा पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही माहीती खेळाडूंना व्हावी यासाठी क्रीडा विभागाकडून या खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना कागदपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले.

उद्योन्मुख खेळाडूंना पुढील स्पर्धांची तयारी करण्यासाठी या शिष्यवृत्तीची मोठी मदत होणार आहे. या खेळाडूंनी उल्लेखनिय काम करून शहराच्या नावात भर टाकली आहे. केवळ कागदपत्र नाहीत म्हणून त्यांना शिष्यवृत्ती नाकारूने ही त्यांच्यावर अन्याय करणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.- राहूल भंडारे ( क्रीडा समिती, अध्यक्ष)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)