क्रीडा विभागाचे “दप्तर’ होणार खुले

पिंपरी- माहिती अधिकारांतर्गत नागरिकांना दर सोमवारी महापालिकेच्या क्रीडा विभागातील कागदपत्रे पहायला मिळणार आहेत. याकरिता पहिला एक तास मोफत तर त्यानंतरच्या प्रत्येक पंधरा मिनिटांसाठी पाच रूपये शुल्क आकारले जाणार आहे. क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त आशा राऊत यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

शासकीय कामकाजात पारदर्शकता व माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत प्राप्त माहिती अर्जाची प्रथम, द्वितीय अपिलीय अर्जांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरिय कार्यालयापासून ते निम्नस्तरिय सर्व कार्यालयांमध्ये महिन्यातील प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळत नागरिकांना माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला देखील हे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार महापालिकच्या क्रीडा विभागात या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्जदाराने मागणी केलेली कागदपत्रे त्याला उपलब्ध करुन दिल्यानंतर त्यासाठी पहिला एक तास नि:शुल्क तर दुसऱ्या तासातील प्रत्येक पंधरा मिनिटांकरिता प्रत्येकी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही कागदपत्रे पाहताना अर्जदाराला मोबाईल अथवा इतर अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय सोमवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)