क्रीडा प्रबोधिनीला दुहेरी मुकूट

File photo

पिंपरी – हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे तर्फे आयोजित पहिल्या ऑलिंम्पिक डे फाईव्ह अ-साईड हॉकी अजिंक्‍यपद (पुरूष आणि महिला) स्पर्धेच्या पुरूष आणि महिला गटात क्रीडा प्रबोधिनीच्या संघाने वर्चस्व गाजवत विजेतेपद मिळवले.

पिंपरीतील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेच्या महिलांच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने पुणे इलेव्हन संघाचा 9-1 असा सहज धुव्वा उडविला. ऋतुजा पिसाळ हिने चार, वैष्णवी फाळके हिने दोन तर, अक्षता ढेकळे व पूजा शेंडगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. पुरूषांच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने रेल्वे पोलीस संघावर शुटआऊटमध्ये 9-7 असा विजय मिळवला. गणेश पाटील व तालिब शहा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. हरीष शिंडगे, राहूल शिंदे, अनिकेत गौरव, राहूल शिंदे, तालिब शहा यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारितोषिक वितरण महाराष्ट्र ऑलिंम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, युवक व क्रीडा संचनालयाचे आयुक्‍त अनिल चोरमळे, ऑलिंम्पिकपटू अजित कारला, विक्रम पिल्ले, भारतीय संघाचे गोलरक्षक आकाश चिकटे व सूरज कारकेरा यांच्या हस्ते झाले. हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीष आनंद, पराग ओझा, नगरसेवक प्रेमकुमार नायर आदी उपस्थित होते. मनोज भोर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)