‘क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नाही’

पालकमंत्री गिरीश बापट यांची ग्वाही

पुणे – संस्कारक्षम क्रीडापटूंची पिढी तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यकम आखणार असून, त्याकरिता क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली. नवभारत निर्मितीसाठी पुढील पाच वर्षांत विविध क्षेत्रात संकल्पातून सिद्धी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने पुण्यासाठीचा क्रीडा सुविधा आणि अंमलबजावणीचा कार्यकम ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या क्रीडा परिषदेचे उद्‌घाटन करताना श्री. बापट बोलत होते. यावेळी क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

परिषदेचे समन्वयक योगेश गोगावले, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, ऍथलेटिक्‍स मार्गदर्शक राम भागवत, हॉकीपटू रेखा भिडे, सुरेखा द्रविड, विद्यापीठाचे क्रीडा प्रमुख दीपक माने, ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे, सुरेखा द्रविड यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

बापट पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. खेळामुळे व्यक्तिगत विकास होतो, जीवनातील ध्येय गाठण्यासाठी उपयोग होतो. अशा क्षेत्रात राजकीय गोष्टींच्या पलिकडे जाऊन काम करण्याची आवश्‍यकता आहे.
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार व संघटना यांनी समन्वय राखून काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत बाळासाहेब लांडगे यांनी व्यक्त केले, पुणे महापालिका क्षेत्रात क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी या परिषदेत कार्यकम निश्‍चित करणार असल्याचे समन्वयक योगेश गोगावले यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांसाठी मैदाने, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, कीडा साहित्य उपलब्ध करून देणे, क्रीडासूची तयार करणे, प्रशिक्षक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.
या प्रसंगी चंद्रकांत शिरोळे, सदानंद मोहोळ, हेमंत जोगदेव, व्ही. व्ही. करमरकर, राम भागवत यांचा गौरव करण्यात आला.
उमेश झिरपे, राघव अष्टेकर, डॉ. दीपक माने, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. साधना देवल, नीता तळवलीकर, देवीदास जाधव, आशिष पेंडसे यांनी विविध खेळांमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना केल्या. सुमंत वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. उदय जोशी यांनी परिचय करून दिला, तर वसंत गोखले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)